शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Pune Bypoll Election 2023: पुण्यात मनसेला मोठे खिंडार; ७ जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 23:18 IST

Pune Bypoll Election 2023: पुण्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच मनसेने ७ जणांची हकालपट्टी केली होती.

Pune Bypoll Election 2023: राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला दावा आणि कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार यामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे. 

महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेत्यांपर्यंत सर्वच नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आमदार रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी भाजपचे नेते जोमाने प्रचार यात्रेत उतरले आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. यातच मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. यामुळे ५० जणांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. 

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा केला प्रचार कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. कसब्यात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारफेरीमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरती नजर ठेवून असलेल्या काही व्यक्तींनी राज ठाकरेंना माहिती पुरविली आणि रवींद्र खेडेकर आणि प्रकाश ढमढेरे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MNSमनसेPuneपुणेRaj Thackerayराज ठाकरे