शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

MLC ELECTION : पदवीधर आणि शिक्षकांचा आमदार होण्यासाठी दहावी पासही रिंगणात, तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीही

By तुळशीदास भोईटे | Updated: June 21, 2018 15:50 IST

कोकण मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला हे गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या यादीत नंबर १ आहेत.

MLC ELECTION : पदवीधर आणि शिक्षकांचा आमदार होण्यासाठी दहावी पासही रिंगणात, तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपीही विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह मानले जाते. तेथे चांगले नागरिक प्रतिनिधी म्हणून असावेत यासाठी पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची तरतुद असते. मात्र यावेळी या मतदारसंघांमधील एक उमेदवार फक्त दहावी पास असून काहींच्या विरोधात गंभीर गुन्ह्यांचीही नोंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण मतदारसंघातील उमेदवार नजीब मुल्ला हे गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या यादीत नंबर १ आहेत. तर त्यांच्याच ठाण्यातील नगरसेवक शिवसेनेचे उमेदवार गुन्हे दाखल असलेल्यांच्या यादीत नंबर दोनवर आहेत. 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार शिक्षक आणि पदवीधरांना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून विधानपरिषदेत त्यांच्यासाठी असलेल्या खास मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमधील एका उमेदवाराची शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास आहे. इतर उमेदवारांमध्ये १६ पदवीधर, १४ व्यावसायिक पदवीधर, १६ पदव्युत्तर, ३ डॉक्टरेट अशा चांगल्या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांचा समावेश आहे. 

एकीकडे शैक्षणिक पात्रतेत दर्जा सांभाळलेला असतानाच गुन्हेगारी नोंदींच्या बाबतीत मात्र दर्जा काहीसा घसरलेला दिसत आहे. गुन्हेगारी नोंदी असलेल्या उमेदवारांच्या यादीत पहिल्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नजिब मुल्ला आहेत. खरेतर एकूण प्रकरणांच्याबाबतीत दुसरे ठाणेकर उमेदवार शिवसेनेचे संजय मोरे हे पुढे आहेत. मात्र त्यांच्याविरोधात एकही गंभीर कलम नाही. तर नजिब मुल्लांच्याविरोधात एका गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याने एडीआरच्या अहवालात ते पहिल्या नंबरवर झळकले असावेत. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष डॉमनिक डाबरे असून श्रीमंतांच्या यादीत पहिल्या नंबरवर असलेले नाशिकचे अपक्ष उमेदवार प्रतापराव सोनावणे यांचे नाव गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांच्या यादीत चौथ्या नंबरवर आहे. अर्थात गुन्ह्यांची नोंद असलेली ही यादी ५१ पैकी ८ उमेदवार असले तरी गुन्ह्यांमधील अनेक प्रकरणे ही राजकीय आंदोलनातील असण्याचीही शक्यता आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकkonkanकोकणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस