आमदार म्हणताहेत, व्हॉटसअ‍ॅप... नको रे बाप्पा!

By Admin | Updated: December 16, 2014 03:47 IST2014-12-16T03:47:54+5:302014-12-16T03:47:54+5:30

गिरीश भाऊकडं डबा खायला ये, असा मेसेज व्हॉटसअ‍ॅपवर दिसला किंवा रामदास भार्इंच्या डब्यातील पापलेटचा फोटो डाऊनलोड झाला

MLAs say, whosasap ... do not ray bappa! | आमदार म्हणताहेत, व्हॉटसअ‍ॅप... नको रे बाप्पा!

आमदार म्हणताहेत, व्हॉटसअ‍ॅप... नको रे बाप्पा!

संदीप प्रधान, मुंबई
गिरीश भाऊकडं डबा खायला ये, असा मेसेज व्हॉटसअ‍ॅपवर दिसला किंवा रामदास भार्इंच्या डब्यातील पापलेटचा फोटो डाऊनलोड झाला की भुकेने कासावीस असलेला नवखा सदस्य पटकन उठतो आणि उठून सभागृहाबाहेर पडतो. त्या वेळी आपण सभागृहातील पाळायचे संकेत व शिष्टाचार यांचा भंग करतो याचे भान त्याला राहत नाही. त्यामुळे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी नवनिर्वाचित सदस्यांना आचारसंहितेचा चमचमीत खाऊ दिला आहे.
विद्यमान विधानसभेतील सुमारे १३० सदस्य हे नवीन आहेत. त्यांना सभागृहातील संकेतांची फारशी कल्पना नाही. तर काही सदस्यांचे मन अजूनही ‘तरुण’ असल्याने सभागृहात असूनही व्हॉटसअ‍ॅप, इंटरनेट यामध्येही रमलेले असतात. काही आमदार एकमेकांना सभागृहाच्या लॉबीत बोलावण्यासाठी किंवा दुपारी जेवणाचा डबा खाण्याचे निमंत्रण व्हॉटसअ‍ॅपवरून धाडतात. भाषणाची पुरेशी तयारी न झालेले सदस्य आकडेवारी व अन्य माहिती सभागृहातच मोबाइल इंटरनेटवर शोधत असतात. त्यामुळे अशा ‘मोबाइलवेड्या’ सदस्यांना समज देण्यासाठी संसदीय कामकाज मंत्र्यांनी आचारसंहिता लागू केली आहे.
असंसदीय शब्दप्रयोग टाळा
भाषण करताना निंदानालस्ती करणारे आरोपात्मक किंवा असंसदीय शब्दप्रयोग करू नयेत. एखादा शब्द वा वाक्प्रयोग असंसदीय आहे, असे अध्यक्षांनी सांगितल्यास त्याबाबत चर्चा न करता ते मागे घेतले पाहिजेत, अशी समज या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे. सभागृहात पक्षाचे चिन्ह असलेली वस्तू (दुपट्टा, फलक वगैरे) आणू नये, अशा सूचनांची जंत्री सदस्यांना देण्यात आली आहे. यामुळे अपशब्द वापरून विरोधी आमदारांवर वार करणाऱ्यांना चाप बसेल.

Web Title: MLAs say, whosasap ... do not ray bappa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.