शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकी गेली उडत,शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या : संदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 14:20 IST

आमदारकी गेली उडत अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या अशा शब्दात राज्यातील आघाडी सरकारवर हल्ला चढवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ऍड.एस.यु.संदे यांनी सांगली जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यानी राहिलेली रक्कम व्याजासह द्यावी.यापुढे गाळप होणाऱ्या उसाची एफआरपी एकरक्कमी द्यावी या मागणीसाठी ८ मार्चला राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले.

ठळक मुद्देआमदारकी गेली उडत,शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या..! स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते एस.यु. संदे

इस्लामपूर : आमदारकी गेली उडत, अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या अशा शब्दात राज्यातील आघाडी सरकारवर हल्ला चढवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ऍड.एस.यु.संदे यांनी सांगली जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यानी राहिलेली रक्कम व्याजासह द्यावी. यापुढे गाळप होणाऱ्या उसाची एफआरपी एकरक्कमी द्यावी या मागणीसाठी ८ मार्चला राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले.संदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन एकरक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेत तो अंमलातही आणला.मात्र सांगली जिल्ह्यातील सोनहीरा, उदगीर आणि दालमिया हे तीन कारखाने वगळता इतर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले.

१५ दिवसाच्या आत एफआरपी देण्याच्या कायद्याचा भंग केला आहे.त्यामुळे या कारखानदारांना सुबुद्धी सुचावी आणि शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्यांना त्वरित मिळावेत यासाठी कोविड आणि जमावबंदी आदेशाचे पालन करून ८ मार्चला सकाळी ११ वाजता राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला हा अभिषेक घालणार आहोत.आमदारकीसाठी दबाव टाकण्यासाठी हे आंदोलन आहे का? या प्रश्नावर संदे यांनी एकदम उसळून आमदारकी गेली उडत, आम्हाला त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढणे महत्वाचे आहे.त्याच्या घामाचा दाम मिळवून देणे आमच्यासाठी आमदारकीपेक्षा मोठे आहे,असे स्पष्ट केले.यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष भागवत जाधव,रमेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangliसांगलीFarmerशेतकरी