शेतकरी आंदोलन प्रकरणी आमदार शशिकांत शिंदेंना अटक
By Admin | Updated: June 2, 2017 12:57 IST2017-06-02T12:57:50+5:302017-06-02T12:57:50+5:30
ष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना आंदोलन प्रकरणात शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आली.

शेतकरी आंदोलन प्रकरणी आमदार शशिकांत शिंदेंना अटक
ऑनलाइन लोकमत
कोरेगाव, दि. 2 - सातारा जिल्ह्यात शेतकरी संप शांततेत सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना आंदोलन प्रकरणात शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आली.
कोरेगावच्या आझाद चौकात आमदार शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी भाजीपाला रस्त्यावर ओतून आंदोलन केले. पूर्व सूचना न देता आंदोलन केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कोरेगाव बंदची हाक दिली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.