शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“एकनाथ शिंदे राजकारणातील कर्ण, देवेंद्र फडणवीस अर्जुन”; सदाभाऊ खोतांचे कौतुकोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:36 IST

Sadabhau Khot: देवेंद्र फडणवीसांनी दिलेले मराठा आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घालवले. शरद पवार राज्याच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

Sadabhau Khot: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे सरकारला राबवायची आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा यांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेतील अपयशाचा वचपा काढण्याच्या इराद्याने महायुती कंबर कसून तयारीला लागली आहे. महायुतीतील नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. यातच एका सभेत बोलताना विधान परिषदेतील आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. 

एका सभेला संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्याच्या राजकारणातील कर्ण हे एकनाथ शिंदे  तर अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत. एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले. देवेंद्र फडणवीसांच्या साथीने महायुतीचे पुन्हा सरकार आणले. राज्य कसे चालवावे, याचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले आहे. कारण देवेंद्र फडणवीसच आपल्याला टफ-फाइट देऊ शकतात, हे शरद पवार यांना कळले आहे. त्यामुळेच वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी करण्यात आल्याचा मोठा दावा सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना केला. 

शरद पवार शकुनीमामा 

मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले. या दोघांवर टीका झाली नाही , ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाली. कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. शरद पवार महाराष्ट्रच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, महायुतीसाठी रविवारचा दिवस घडामोडींनी भरलेला होता. एकीकडे महायुतीत तणाव वाढेल अशी घटना रविवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे घडली आणि त्यावरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, तर दुसरीकडे महायुतीचे तीनही प्रमुख नेते राज्यातील विविध भागात लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसले. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Mahayutiमहायुती