शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना केंद्रातच मुक्काम ठाेकून आमदार नीलेश लंके यांची रुग्णसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:11 IST

लंके यांनी २०२०च्या कोरोना लाटेत एक हजार रुग्णांना सामावून घेणारे कोविड सेंटर उभारले होते.

सुधीर लंके -अहमदनगर : प्रत्येक कोरोना रुग्ण हेच माझे कुटुंब आहे. त्यामुळे आपण सध्या पूर्णवेळ कोरोना रुग्णांसोबत राहत असून, घरी रडत बसण्याचा हा काळ नाही, असे प्रतिपादन करीत पारनेर-नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.लंके यांनी २०२०च्या कोरोना लाटेत एक हजार रुग्णांना सामावून घेणारे कोविड सेंटर उभारले होते. त्याबद्दल ‘लोकमत’ने त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ हा अवॉर्ड देऊन गौरविले. यावर्षी त्यांनी भाळवणी येथे ‘शरद पवार आरोग्य मंदिर’ नावाने अकराशे बेडचे सेंटर उभारले आहे. त्यातील शंभर बेडवर ऑक्सिजनची सुविधा आहे. लंके यांनी स्वत: या सेंटरमध्ये मुक्काम ठोकला असून, रात्री-अपरात्री ते स्वत: डॉक्टरांसारखे रुग्णांजवळ जाऊन त्यांची देखभाल करत आहेत.जिल्ह्यात साखर कारखानदार व शिक्षण सम्राट आहेत. त्यांनी कोविड सेंटर उभारण्यात रस दाखविला नाही. लंके यांच्या पाठीशी मात्र कुठलीही संस्था नसताना त्यांनी सेंटर उभारले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी हे सेंटर उभारण्याचे ठरविले व हजारो हात माझ्या मदतीला आले. परदेशांतूनही मदत आली. मुलांनी खाऊचे पैसे या केंद्रासाठी पाठविले. सुमारे दहा ट्रक धान्य, भाजीपाला, फळे अशी रसद मिळाली. आत्तापर्यंत बाविसशे रुग्ण बरे झाले.

केंद्रात रुग्णांचे मनोरंजन : कोरोना रुग्णांच्या मनातील भीती घालविणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे मी स्वत: न घाबरता रुग्णांजवळ जातो. रात्री दीड-दोन वाजताही रुग्णांना काही त्रास होत आहे का, यावर लक्ष ठेवतो. येथे वातावरण जाणीवपूर्वक आनंदी ठेवले आहे, असे नीलेश लंके यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस