मुंबई - ज्यांना फुटायचे होते ते याआधीच फुटले आहेत. काही जणांना आता नवा उद्योग सुचला आहे. उद्योगमंत्री आहेत म्हणून काहीही उद्योग करत आहेत. उद्धवसेनेचे २० आमदार आणि ९ खासदारांपैकी एकही आता फुटणार नाही, असा दावा उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी बुधवारी केला.शिंदेसेनेचे माजी खा. शेवाळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धवसेनेचे काही आमदार, खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्याला उत्तर देताना खा. सावंत म्हणाले, की उद्योगमंत्री दावोसला बसून ते कोणते करार करत आहेत? आमदार, खासदारांना फोडण्यासाठी त्यांच्याकडून किती कोटी रुपयांचे करार झाले? हे त्यांनी सांगावे.
‘आमदार, खासदार फुटणार नाहीत’, अरविंद सावंत यांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:30 IST