आमदार महेश लांडगे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 18:25 IST2016-10-13T18:25:03+5:302016-10-13T18:25:03+5:30
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यपदासह नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आतापर्यंतचे त्यांचे

आमदार महेश लांडगे यांचा राजीनामा
ऑनलाइन लोकमत
पिंपरी -चिंचवड, दि. 13 - भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यपदासह नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आतापर्यंतचे त्यांचे भाजपा प्रवेशाबद्दलचे तळ्यात मळयात वातावरण संपुष्टात आले असून त्यांचा भाजपातील प्रवेश निश्चित झाला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सादर केला. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार लांडगे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राजकीय समिकरणे बदण्यास कारणीभूत ठरू शकणारा आहे.