आमदार लाड यांची अधिकाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: August 17, 2016 05:01 IST2016-08-17T05:01:37+5:302016-08-17T05:01:37+5:30
रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी भूमी संपादनाच्या मुद्द्यावरून कर्जत तहसील कार्यालयात रिलायन्सचे अधिकारी व रिलायन्स गॅस पाइपलाइन विशेष

आमदार लाड यांची अधिकाऱ्याला मारहाण
अलिबाग : रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी भूमी संपादनाच्या मुद्द्यावरून कर्जत तहसील कार्यालयात रिलायन्सचे अधिकारी व रिलायन्स गॅस पाइपलाइन विशेष भूमी संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांच्याशी शेतकऱ्यांसह चर्चा सुरू असताना वाद झाल्याने कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकारी कलगुटकर यांना मारहाण केल्याचा प्रकार चित्रफितीच्या माध्यमातून समोर आला.
आमदार लाड उपजिल्हाधिकारी कलगुटकर यांना मारहाण करीत असल्याचे व्हीडीओत दिसत आहे. सोशल मीडियावरून तो व्हीडीओ व्हायरल झाला आहे. मात्र या कथित मारहाणप्रकरणी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर वा अन्य कुणा सरकारी अधिकाऱ्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, असा प्रकार घडला असेल तर तो राजपत्रित अधिकारी संघटना अत्यंत गांभीर्याने घेईल, असे रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)