आमदार गोविंद राठोड यांचे हृदयविकाराने निधन
By Admin | Updated: October 27, 2014 08:58 IST2014-10-27T02:32:26+5:302014-10-27T08:58:42+5:30
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड (६५) यांचे हृदयविकाराने रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास निधन झाले

आमदार गोविंद राठोड यांचे हृदयविकाराने निधन
जालना : नांदेड जिल्ह्याच्या मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड (६५) यांचे हृदयविकाराने रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास निधन झाले. मुंबई येथे आयोजित भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड येथून देवगिरी एक्स्प्रेसने निघाले असताना प्रवासातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
जालना स्थानक येण्यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. सोबत त्यांचा डॉक्टर मुलगा आणि एक कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याने यासंदर्भात जालन्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली आणि सहकार्य मागितले. आंबेकर हे रुग्णवाहिका घेऊन जालना स्थानकावर पोहोचले. तेथून राठोड यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. (प्रतिनिधी)