शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वारीवर बोलणाऱ्याचे थोबाड रंगविणार, आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:17 IST

राज्य सरकारने धर्मांतरण बंदीचा कडक कायदा तातडीने करावा

इचलकरंजी : राज्य सरकारने धर्मांतरण बंदीचा कडक कायदा तातडीने करावा. ऋतुजा राजगे हिला न्याय मिळवून द्यावा, अशी राज्य सरकारकडे मागणी करण्याबरोबरच पंढरीच्या वारीवर बोलणाऱ्याचे थोबाड पावसाळी अधिवेशनात रंगवल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.ऋतुजा राजगे हिला न्याय मिळाला पाहिजे आणि धर्मांतरणाला विरोध करीत शिवतीर्थ येथून सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने महिलांच्या हस्ते प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले.प्रांत कार्यालयासमोर आयोजित सभेत बोलताना आमदार पडळकर म्हणाले, धर्मांतरणाचे प्रस्थ वाढले आहे. शिक्षण आणि घर बांधणीसाठी मदत देण्याचे आश्वासन देऊन गोरगरिबांना ओढले जाते आणि नंतर त्यांचे धर्मांतरण केले जाते. असे करणाऱ्या पादरींना ठोकून काढले पाहिजे. हिंदू समाजाला मिळणारा आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरी करतात. मात्र, प्रत्यक्षात हिंदूऐवजी दुसऱ्या पद्धतीचे आचरण समाजात करतात.

वाचा- ‘अबू आझमी’ना वारीचे महत्त्व समजावून सांगेन : हसन मुश्रीफसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार नोकरीसाठी घेतलेले आरक्षण ज्या पद्धतीचे असते, त्या पद्धतीनेच आचरण करणे गरजेचे आहे. वेगळ्या पद्धतीने जर कोण आचरण करत असेल, तर त्यांची यादी तयार करा आणि त्यांना सेवेतून काढून टाकण्यासंदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषदेला निवेदन द्या. त्याचा पाठपुरावा मी करेन.आमदार पडळकर म्हणाले, हे राष्ट्र आमचे, वारी आमची. पांडुरंग आमचा, वारकरी आमचे आणि विनाकारण काही लोक वारीवर बोलत आहेत. त्यांना ठोकून काढण्यास आम्ही सज्ज आहोत. मालेगावचा आमदार औरंगजेबचे गुनगान गात आहे. त्याला गाडले पाहिजे. शासनाने धर्मांतरणविरोधी कायदा तातडीने करावा आणि त्याला धर्मवीर संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे. यावेळी आमदार राहुल आवाडे, गजानन महाजन-गुरुजी, आदी उपस्थित होते.