आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजपा नगरसेवकाकडून मारहाण
By Admin | Updated: April 9, 2016 19:36 IST2016-04-09T19:33:37+5:302016-04-09T19:36:34+5:30
लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण करण्यात आली आहे

आमदार गोपालदास अग्रवाल यांना भाजपा नगरसेवकाकडून मारहाण
>ऑनलाइन लोकमत -
गोंदिया, दि. ९ - लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण करण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शिव शर्मा यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली आहे. पत्रकार परिषद सुरु असताना संध्याकाळी 6.40च्या दरम्यान ही मारहाण करण्यात आली. नगरपालिकेतील भ्रष्ट कामात खोळंबा घालत असल्याने शिव शर्मा ही गुंडगिरी करत असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.