शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: आमदार अपात्रतेचा चेंडू आता घटनापीठाकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 05:26 IST

कोर्ट म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेता येणार नाही

नवी दिल्ली : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल कोणताही निर्णय घेण्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने मनाई केली. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या प्रतोदांमार्फत बजाविण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसा तसेच विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत शिवसेनेने केलेल्या आव्हान याचिकांवर घटनापीठापुढे सुनावणी होईल, असे कोर्टाने सोमवारी स्पष्ट केले. 

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत आघाडी केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला शिवसेनेने आव्हान दिले आहे. तसेच शिंदे गटाचे भरत गोगावले यांना शिवसेनेचे प्रतोद म्हणून विधानसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेनेने केलेला आहे. याचवेळी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची राज्यपालांनी केलेली निवडही राज्यघटनेतील तरतुदींच्या विरोधात असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. 

बंडखोर आमदारांना काहीसा दिलासाविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीवर सुनावणी घेण्यासही सरन्यायाधीशांनी नकार दिला. त्यामुळे झिरवाळ यांनी नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

आदेशाची माहिती अध्यक्षांना कळवा 

  • उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या सदस्यांना नोटीस बजावली आहे. त्यावर त्वरित सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात केली. 
  • त्याबाबत सरन्यायाधीश रामन यांनी आदेश दिला की, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोणताही निर्णय घेता येणार नाही. 
  • या आदेशाची माहिती विधानसभा अध्यक्षांना तुमच्या कार्यालयाद्वारे कळवा, असा आदेश सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना दिला. त्याला मेहता यांनी संमती दर्शविली.
  • या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहेत. या प्रकरणाची सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली.

ही याचिका १२ जुलै रोजी पटलावर घेणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घटनापीठापुढे झाली पाहिजे. यासाठी ही याचिका पटलावर घेण्यास काही वेळ लागेल.सरन्यायाधीश

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे