पैठणमध्ये आमदार भुमरे यांना हादरा, 'संत एकनाथ'मध्ये सत्तांतर
By Admin | Updated: July 1, 2016 17:54 IST2016-07-01T17:54:50+5:302016-07-01T17:54:50+5:30
संत एकनाथ सहकारी कारखाना निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांच्या विरोधात मतदारांनी कौल देत २१ पैकी १८ जागेवर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे

पैठणमध्ये आमदार भुमरे यांना हादरा, 'संत एकनाथ'मध्ये सत्तांतर
ऑनलाइन लोकमत
पैठण, दि. १ - संत एकनाथ सहकारी कारखाना निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांच्या विरोधात मतदारांनी कौल देत २१ पैकी १८ जागेवर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे, भाजपा तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, माजी चेअरमन आप्पासाहेब पाटील व सचिन घायाळ यांच्या संयुक्त पॅनेलच्या उमेदवारांना विजयी केले.
आमदार संदीपान भुमरे यांच्या पारड्यात अवघ्या तीन जागा पडल्या. यात ते स्वत: विजयी झाले.
संत एकनाथ सहकारी कारखानावर गेल्या १५ वर्षांची अबाधित सत्ता आज झालेल्या पराभवामुळे आमदार संदीपान भुमरे यांना गमावावी लागली आहे. तालुक्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची तुषार शिसोदे, संजय वाघचौरे यांनी केलेली किमया व तालुक्यातील सर्व विरोधकांच्या मताचे झालेले धृवीकरण आमदार संदीपान भुमरे यांच्या पराभवाचे कारण मानले जात आहे.