आमदार बच्चू कडू यांना अटक

By Admin | Updated: March 31, 2016 03:41 IST2016-03-31T03:41:30+5:302016-03-31T03:41:30+5:30

मंत्रालयातील उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अपक्ष आमदार बच्चू कडू अखेर बुधवारी रात्री पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांना

MLA Bachu Kadu arrested | आमदार बच्चू कडू यांना अटक

आमदार बच्चू कडू यांना अटक

मुंबई : मंत्रालयातील उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अपक्ष आमदार बच्चू कडू अखेर बुधवारी रात्री पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
बच्चू कडू यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांपुढे हजर होण्यापूर्वी कडू यांनी आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचा पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)

मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात शरणागती
मंत्रालय कर्मचारी संघटना कडू यांच्या अटकेसाठी आग्रही असल्याने त्यानुसार कारवाईसाठी विधान भवनाच्या परिसरात दुपारपासून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. सायंकाळी कामकाज संपल्यानंतर कडू यांना अटक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते थेट आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यात गेले. या वेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि किशोर पाटील होते. कडू यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणेही कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: MLA Bachu Kadu arrested