शरीरसंबंधास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीचा खून

By Admin | Updated: May 15, 2017 07:25 IST2017-05-15T00:58:29+5:302017-05-15T07:25:23+5:30

मित्राच्या पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्याने तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नराधमाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

Mitra's wife murdered by refusing body | शरीरसंबंधास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीचा खून

शरीरसंबंधास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मित्राच्या पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्याने तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नराधमाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. हितेश कर्तकपाडी (२३) असे त्याचे नाव असून श्वेता महेद्र तांडेल (२८, रा,सुंदरनगर, कुलाबा) हिचा त्याने बुधवारी निर्घृण खून केला होता. त्यानंतर अज्ञात लोकांनी घरात घुसून तिची हत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, असे परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

महेंद्र तांडेल हा पत्नीसह सुंदरनगरात राहावयास असून त्याच्या घराच्या वरच्या खोलीत हितेश व अन्य दोघे जण राहत होते. चौघे जण सेल्समनचे काम करतात. बुधवारी महेंद्र व अन्य दोघे जण कामावर गेल्यानंतर हितेश तेथेच थांबला होता. त्याने श्वेता हिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र तिने नकार दिल्याने जबरदस्ती करू लागला असताना ती जमिनीवर पडल्याने डोक्याला मार लागला.

जखमी झाल्याने आपल्याविरुद्ध तक्रार करेल, या भीतीने हितेशने स्वयंपाक घराच्या खोलीत असलेल्या चाकूने तिचा गळा कापला. ती ठार झाल्यानंतर हितेश गुपचूपपणे कामाच्या ठिकाणी गेला. घरातून खाली उतरत असताना खोलीमध्ये काही लोक गेले होते, ते तिच्या परिचयाचे असतील म्हणून आपण विचारणा न करता कामाच्या ठिकाणी निघून गेलो, असे हितेशने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्याच्या जबाबातील विसंगती असल्याने ‘खाक्या’ दाखविल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त शर्मा यांनी सांगितले.

Web Title: Mitra's wife murdered by refusing body