किरकोळ वादातून मित्राची हत्या

By Admin | Updated: May 19, 2016 02:47 IST2016-05-19T02:47:19+5:302016-05-19T02:47:19+5:30

मित्रांमध्ये मस्करी सुरू असताना धक्का लागल्याच्या रागात, मित्राची हत्या केल्याची घटना मंगळवारी मानखुर्द येथे घडली.

Mitra murdered by a minor dispute | किरकोळ वादातून मित्राची हत्या

किरकोळ वादातून मित्राची हत्या


मुंबई : मित्रांमध्ये मस्करी सुरू असताना धक्का लागल्याच्या रागात, मित्राची हत्या केल्याची घटना मंगळवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत, १७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
अमीर शेख (१८) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मानखुर्दच्या मंडाळा परिसरात कुटुंबीयांसह राहायचा. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अटक आरोपी आणि शेख
दोघेही गप्पा मारत होते. त्यात गप्पांमध्ये मस्करी सुरू असताना शेखच्या धक्क्यामुळे आरोपी खाली कोसळला. याचाच राग मनात धरून आरोपीने बाजूलाच असलेल्या बांबूने शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करताच आरोपीने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी रात्रभर त्याचा शोध घेत बुधवारी सकाळी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mitra murdered by a minor dispute