व्हॉटस अॅपवरील चॅटिंगच्या वादातून मित्राला भोसकले
By Admin | Updated: September 4, 2016 19:08 IST2016-09-04T19:08:33+5:302016-09-04T19:08:33+5:30
व्हॉटसअॅपवरील चर्चेला वादाचे वळण लागल्यानंतर एका मित्राने दुस-या मित्राला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

व्हॉटस अॅपवरील चॅटिंगच्या वादातून मित्राला भोसकले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - व्हॉटसअॅपवरील चर्चेला वादाचे वळण लागल्यानंतर एका मित्राने दुस-या मित्राला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. अपमानित झाल्याच्या भावनेतून मनिष शहा (२६) याने श्रेयस नवलकर (२१) या आपल्या मित्रावर वार केला.
मनिषच्या वडिलांचा दादरला स्टीलचा व्यवसाय आहे. श्रेयस प्रोडक्शन डिजायनर आहे. शुक्रवारी चॅटिंग दरम्यान दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
संतापलेला मनिष दादरवरुन आपली दुचाकी घेऊन निघाला तो थेट ग्रँण्टरोडला पोहोचला. ग्रँण्टरोडच्या नवाझ सिनेमा कपांऊडच्या आवारात त्याने श्रेयसच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला. यात श्रेयस जखमी झाला आहे.