शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाकडून क्रांतिकारांचा अवमान, बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहास पुस्तकात चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:26 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक ४ मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

अमरावती - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक ४ मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार क्रांतिकारकांचा अवमान करणारा होय, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. याप्रकरणी दोषींना कठोर शासन व्हावे,

यासाठी निवेदन सादर केले आहे. मुक्त विद्यापीठाचे अमरावती विभागीय संचालक अंबादास मोहिते यांना सोमवारी अभाविपने दिलेल्या निवेदानातून क्रांतिकारकांचा अपमान करण्यामागे कुणाचा हात आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांची महत्त्वाची भूमिका होती. हे सर्वश्रूत असताना मुक्त विद्यापीठाने बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या पुस्तकात क्रांतिकारकांचा अपमान करून विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात चळवळीचा उगम, वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य, कुका आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य, बंगाल व इतर प्रांतातील क्रांतिकार्य, भारताबाहेरील दहशतवादी चळवळ, क्रांतिकारकांच्या चळवळीचे अपयश या विषयाचे विवेचन आहे. मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम तयार करताना स्वतंत्र मंडळ असते. त्यामुळे ही गंभीर चूक अभ्यास मंडळाच्या लक्षात येऊ नये, हे आश्चर्य असल्याचे अभाविपने म्हटले आहे. पुस्तकातील चूक त्वरेने दुरूस्त करावी, दोषींवर कठोर शासन व्हावे, अन्यथा राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा अभाविपचे प्रदेश सहमंत्री ज्ञानेश्र्वर खुपसे, महानगर सहमंत्री प्रतीक जोशी, शिवानी मोरे, आनंद बुंदले, स्वाती कठाळे, धनश्री जोशी, रोहन देवलसे, अभिषेक काळे, दुर्गेश साठवणे आदींनी दिला आहे.         विद्यार्थ्यांना डिस्टंट मोडमध्ये पुस्तक वाटप होतात. मुक्त विद्यापीठाकडून बी.ए. द्वितीय इतिहासाच्या पुस्तकात देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ असा अनावधानाने उल्लेख झाला आहे. ही बाब नाशिक मुख्यालयात कळविली आहे. पुढच्या वर्षी यात नक्कीच सुधारणा होईल.     - अंबादास मोहिते,   संचालक, मुक्त विद्यापीठ अमरावती विभागीय केंद्र        क्रांतिकारकांच्या लढ्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, हे विसरता येणार नाही. असे असताना मुक्त विद्यापीठाने चक्क क्रांतिकारकांच्या लढ्यालाच दहशतवादी चळवळ, असे संबोधून समस्त क्रांतिकारकांचा अवमान केला आहे. यातील दोषींना कठोर शासन झाले पाहिजे.   - ज्ञानेश्वर खुपसे,      प्रदेश सहमंत्री, अभाविप

टॅग्स :Educationशिक्षणYashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठhistoryइतिहास