‘नीरी’चे मिशन गंगा
By Admin | Updated: October 27, 2014 00:37 IST2014-10-27T00:37:01+5:302014-10-27T00:37:01+5:30
गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नांत ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. ‘नीरी’ने सांडपाणी शुद्धीकरणासाठी राबविलेल्या ‘नागपूर

‘नीरी’चे मिशन गंगा
‘नागपूर पॅटर्न’नुसार हवा ‘अॅक्शन प्लॅन’ : मोहिमेसंदर्भात उमा भारतींची वैज्ञानिकांशी चर्चा
गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नांत ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. ‘नीरी’ने सांडपाणी शुद्धीकरणासाठी राबविलेल्या ‘नागपूर पॅटर्न’नुसार ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत आहे. केंद्रीय जलसंधारण व नदीसंवर्धन मंत्री उमा भारती यांनी रविवारी ‘नीरी’ला भेट देऊन तेथील वैज्ञानिकांशी सखोल चर्चा केली. गंगा शुद्धीकरणाच्या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केंद्र सरकारला लवकरात लवकर करायची आहे. त्यामुळे पुढील १५ महिन्यांच्या आत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरींग’चा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे ‘मिशन’ उमा भारती यांनी ‘नीरी’समोर ठेवले आहे.
पवित्र गंगा नदीत होणारा सांडपाण्याचा निचरा थांबवण्याचे सर्वात कठीण आव्हान मोदी सरकारने स्वीकारले आहे. गंगा स्वच्छता योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘नीरी’कडे ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी रविवारी सकाळच्या सुमारास ‘नीरी’ला भेट देली. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासंदर्भात ‘नीरी’ने केंद्र शासनाला प्रस्ताव सादर केला होता. या अनुषंगाने या मोहिमेतील निरनिराळ्या मुद्यांवर उमा भारती यांनी वैज्ञानिकांशी तासभर चर्चा केली. ‘नीरी’ने प्रस्तावित केलेल्या गोमुखापासून ते हुगली पर्यंत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’संदर्भातील निरनिराळ्या बाबींची त्यांनी समीक्षा केली.
काय आहेत सूचना
‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरींग’चा ‘अॅक्शन प्लॅन’ १५ महिन्यांच्या आत तयार व्हावा
मनुष्य व जलचरांशी संबंधित मापदंडांचा अभ्यासात समावेश व्हावा
‘आर्सेनिक’चा प्रभाव कमी करण्यासंदर्भात बाबींचा अभ्यास व्हावा
वेळेत अहवाल सादर करण्यावर भर द्यावा