मिशन अकरावी आजपासून
By Admin | Updated: June 17, 2014 00:58 IST2014-06-17T00:58:39+5:302014-06-17T00:58:39+5:30
शालांत परीक्षांचा निकाल मंगळवारी लागणार असतानाच अकरावी प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे. यंदा विज्ञान व द्विलक्षीप्रमाणेच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे.

मिशन अकरावी आजपासून
नागपूर : शालांत परीक्षांचा निकाल मंगळवारी लागणार असतानाच अकरावी प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे. यंदा विज्ञान व द्विलक्षीप्रमाणेच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
शहरातील १७० कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान, द्विलक्षी, कला व वाणिज्य शाखांतील ३९ हजार ७८० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत द्विलक्षी व विज्ञान शाखांचे प्रवेश या प्रक्रियेतून झाले. त्यामुळे शाखानिहाय रंगीत अर्जांची संख्या मर्यादित होती. परंतु यंदा शाखा वाढल्या आहेत. त्यामुळे शाखा व माध्यमनिहाय निरनिराळ्या रंगांचे प्रवेशअर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती सहायक शिक्षण संचालक व केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव डॉ. एस.एन.पटवे यांनी दिली. विद्यार्थी शाळेतूनच अर्ज भरू शकणार आहेत हे विशेष. (प्रतिनिधी)