एका मंत्र्याकडून महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 06:15 IST2016-07-20T06:15:06+5:302016-07-20T06:15:06+5:30

राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याने एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करून, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली.

Mismanagement of a Minister with a Women Officer | एका मंत्र्याकडून महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन

एका मंत्र्याकडून महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन


मुंबई : राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याने एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करून, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली.
कोपर्डी येथील बलात्कार व खूनप्रकरणी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेदरम्यान राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्याच एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी अत्यंत वाईट वर्तन केले आहे.
या घटनेची तक्रार संबंधित महिला अधिकाऱ्याने दुसऱ्या एका कॅबिनेट मंत्र्यांकडे करून, संबंधितांना समज द्या, अन्यथा यापुढे मी त्यांच्याकडे जाणार नाही, असे सांगितले. मंत्रालयातील महिलाच जर सुरक्षित नसतील, तर कोणाचे अच्छे दिन आले? असा सवाल राणे यांनी सभागृहात केला. आपल्या भाषणात व्यत्यय येत असल्याचे पाहून काही बोलाल तर इथेच नाव जाहीर करेन, अशी तंबीही राणे यांनी दिली. (प्रतिनिधी)
>मारिया यांची बदली आणि दहा कोटी
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून राकेश मारिया यांच्या बदलीसाठी ताज हॉटेलमध्ये १० कोटींची रक्कम एका अधिकाऱ्याने नेली होती. किती बॅगांमध्ये ही रक्कम भरली होती, कोणी कोणासाठी नेली, इथपासून त्याचे सीसीटीव्ह फुटेजही माझ्याकडे उपलब्ध आहे. राकेश मारियांच्या बदलीमागील अनेक कारणांपैकी हेही एक कारण होते का, असा सवालही राणे यांनी केला.

Web Title: Mismanagement of a Minister with a Women Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.