शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

मिरज - बलात्कार पिडीतेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 18:24 IST

मिरजेतील स्वाती अमर कुडचे (वय २९) या अत्याचार पीडित तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अमित अण्णासाहेब कुरणे, त्याचे वडील अण्णासाहेब तम्माण्णा कुरणे

ऑनलाइन लोकमत

मिरज, दि. 08 -  मिरजेतील एका अत्याचार पीडित तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अमित अण्णासाहेब कुरणे, त्याचे वडील अण्णासाहेब तम्माण्णा कुरणे व आई सुनीता यांना सोमवारी अटक केली. पोलिसांच्या ताब्यातील अमित कुरणे यास मनसे महिला आघाडीच्या स्वाती शिंदे यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. आरोपींना ताब्यात देण्याची मागणी करीत सर्वपक्षीय महिलांनी पोलिस ठाण्यात जोरदार आंदोलन केले. अमित कुरणे याच्यासह तिघांना न्यायालयाने बारा दिवस कोठडी दिली. पीडित तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दीड महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित कुरणे फरारी होता.  तिच्या  सासरच्या मंडळींनी स्वीकारण्यास नकार दिल्याने तिने अमित कुरणे याच्या शेतातील घरात जाऊन वास्तव्य केले. तिने कुरणे यांच्या घरातून जाण्यास नकार दिल्यानंतर अमितची आई सौ. सुनीता कुरणे यांनी पीडितेकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी करीत असल्याची पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी तिच्या विरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. बलात्कार प्रकरणातील आरोपीस अटक न करता पोलिसांनी आपल्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचे समजताच शनिवारी रात्री पीडितेने मळ्यात घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे आई-वडिलांसह संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आंदोलन करीत आत्महत्येस प्रवृत्त करणा-यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा  पवित्रा घेतला. पीडितेच्या आत्महत्येमुळे तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणा-या पोलिसांचीही धावपळ उडाली अमित कुरणे, अण्णासाहेब कुरणे, सुनीता कुरणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या पथकाने फरारी अमित कुरणे यास मुंबईतून आणि अण्णासाहेब कुरणे व सुनीता कुरणे यांना सोलापूर परिसरातून रविवारी रात्री ताब्यात घेतले. तिघांना सोमवारी मिरजेत पोलिस ठाण्यात आणल्यानंतर मनसे महिला आघाडीच्या स्वाती शिंदे यांच्यासह अन्य महिलांनी अमित कुरणे यास मारहाण केली. शिवसेना, राष्टÑवादी, मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आरोपीस ताब्यात देण्याची मागणी करीत आंदोलन केले. आरोपींना बेड्या घालून न्यायालयात नेण्याची मागणी करीत निदर्शने करणाºया महिलांनी पोलिसांशी वादावादी केली.अ‍ॅड. प्रविणा हेटकाळे, मनसेच्या स्वाती शिंदे, राष्टÑवादीच्या नगरसेवविका संगीता हारगे, राधिका हारगे, शिवसेनेच्या सुनीता मोरे, सुवर्णा मोहिते, शोभाताई आडसुळे, मंदा जगताप, मनीषा पाटील, सुजाता इंगळे, रूक्मिणी अंबिगिरे, यांच्यासह अभिजीत हारगे, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, संभाजी मेंढे, अभिजीत ताशिलदार, विजय माळी, मिलिंद हारगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. जमाव आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. जादा पोलिस कुमक मागवून आरोपींना पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयातही मोठी गर्दी झाली होती. अमित कुरणे व त्याच्या आई-वडिलांना न्या. एस. एम. कोळेकर यांनी बारा दिवसांची पोलिस कोठडी दिली.