शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना काळातही मीरा-भाईंदरमधून महसूल विभागाने केली आता पर्यंतची विक्रमी कर वसुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 12:05 IST

८ कोटी ६५ लाख रुपये इतका महसुली कर झाला जमा 

ठळक मुद्दे८ कोटी ६५ लाख रुपये इतका महसुली कर झाला जमा कोरोना काळातही झाली विक्रमी करवसूली

मीरारोड - मीरा भाईंदर अपर तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाने मीरा भाईंदर शहरातून महसुली कर वसुलीचा आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला आहे. कोरोना संसर्ग काळात आर्थिक स्थिती अडचणीची असताना सुद्धा करदात्यांनी महसूल विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ८ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपये इतका विक्रमी कर भरणा केला. मीरा भाईंदर मध्ये २०१९ साली स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय अस्तित्वात आल्या नंतर अपर तहसीलदार म्हणून नंदकिशोर देशमुख यांची नियुक्ती केली गेली. तहसीलदार कार्यालय आधी भाईंदरच्या ९० फुटी मार्गावर चक्क लिफ्ट नसलेल्या दुसऱ्या मजल्यावर अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी पालिकेने दिले होते. ता नंतर ते चक्क कनकियाच्या टोकाला एका बाजूस नेण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु लोकमतने या बाबत आवाज उठवल्या नंतर तहसीलदार कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भाईंदरच्या मॅक्सस मॉल मागील पालिका इमारतीत सुरु करण्यात आले. यामुळे शहरातील नागरिकांना सदर कार्यालय सोयीच्या ठिकाणी होऊन दिलासा मिळाला आहे. नागरिकांना आता ठाण्याला खेपा माराव्या लागत नाहीत. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी प्रशांत कापडे, तलाठी अनिता पाडवी, नितीन पिंगळे, अभिजित बोडके, वंदना आव्हाड, रमेश फाफाळे व कराचार्यानी २०२०-२०२१ ह्या आर्थिक वर्षात आता पर्यंतची सर्वात जास्त महसुली कर वसुली केली आहे. विक्रमी करवसूलीमीरा भाईंदर शहरातून इतकी वर्ष कधी  महसुली उत्पन्न शासना कडे जमा झाले नव्हते. परंतु देशमुख यांच्या मार्गदर्शन व नियोजन खाली मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्या मुळे कोरोनाच्या संसर्ग काळात सुद्धा करदात्यांनी तब्बल ८ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपये इतका महसुली कर भरला आहे. त्यामध्ये ६ कोटी २१ लाख ६८ हजार हे जमीन महसुली कराचे, तर २ कोटी ४४ लाख ६ हजार रुपये गौणखनिज चे उत्पन्न जमा झाले आहे. 

२०१९ - २०२० सालात सुद्धा अपर तहसीलदार कार्यालयाने ४ कोटी ३० लाख ७८ हजार रुपये इतका कर शासनास वसूल करून दिला होता . परंतु जेव्हा अपर तहसीलदार कार्यालय नव्हते त्यावेळी मात्र फारशी कर वसुली झाली नसल्याचे गेल्या तीन - चार वर्षाच्या आकडेवारी वरून दिसुन येते. मीरा-भाईंदर साठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय व्हायच्या आधी सन २०१८ - २०१९ या आर्थिक वर्षात जमीन महसूल व गौणखनिज मिळून १ कोटी ५८ लाख ६४ हजार रुपये तर सन २०१७ - २०१८ साली फक्त जमीन महसूल कर १ कोटी १५ लाख रुपये इतकाच वसूल झाला होता . 

मीरा भाईंदरच्या जागरूक करदात्या नागरिकांनी यंदा महसूल विभागाच्या आवाहनास चांगला प्रतिसाद देऊन कर भरणा केला आहे. मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा कर भरण्यासाठी पाठपुरावा केला. हा कर शासकीय सुविधा व योजनां मार्फत जनतेसाठी खर्च होत असतो. नागरिकांनी नियमित कर भरून सहकार्य करावे.नंदकिशोर देशमुख (अपर तहसीलदार)  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरTaxकरcorona virusकोरोना वायरस बातम्या