अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार
By Admin | Updated: July 14, 2014 03:35 IST2014-07-14T03:35:54+5:302014-07-14T03:35:54+5:30
जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या मुलीवर वर्षभर अत्याचार करण्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार
मुंबई : जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या मुलीवर वर्षभर अत्याचार करण्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. याबाबत मुलीने तक्रार केल्यानंतर व्ही.पी. रोड पोलिसांनी आरोपीला आज अटक केली आहे.
आई, लहान भाऊ आणि पित्यासोबत ही पीडित मुलगी गिरगावातील विठ्ठलभाई पटेल मार्गावरील एका चाळीत राहते. चाळीतील लहानशा खोलीत सर्व एकत्र राहत असल्याने पीडित मुलगी झोपल्यानंतर आरोपी तिच्यावर अत्याचार करीत असे. तिने त्याला अनेकदा विरोध केला. मात्र आरोपीने पीडित मुलीला ठार मारण्याची धमकी दिल्याने ती हा अत्याचार सहन करीत होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. आईने याबाबत जाब विचारला असता आरोपीने तिलाही ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र वडिलांकडून होणारा अत्याचार वाढतच असल्याने अखेर मुलीने ही बाब मित्र-मैत्रिणींना सांगितली. त्यांनी धीर देत व्ही.पी. रोड पोलीस ठाणे गाठले. (प्रतिनिधी)