अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष बलात्कार
By Admin | Updated: February 4, 2015 02:32 IST2015-02-04T02:32:26+5:302015-02-04T02:32:26+5:30
कोणीही जवळचे नातेवाईक नसलेल्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ११ वर्षांच्या मुलीवर दीड वर्ष सातत्याने बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष बलात्कार
अलिबाग : कोणीही जवळचे नातेवाईक नसलेल्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ११ वर्षांच्या मुलीवर दीड वर्ष सातत्याने बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्र्रकार अलिबागच्या पिटकीरी गावात घडला. मुलगी खारघर येथील प्रेरणा नवनिहाल बालिकाश्रमात राहत होती. याप्रकरणी भगवान कोठेकर, दिपक पाटील, रामनाथ म्हात्रे आणि मोरेश्वर म्हात्रे या चौघांविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
या चौघांनी आपापल्या घरातच या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादित नमुद केले आहे. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
२८ मार्च २०१४ रोजी ही पिडीत मुलगी नवी मुंबईतील खारघर येथील बालिकाश्रममध्ये दाखल झाली. तिच्यावर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याचे तिच्याकडूनच बालिकाश्रमातील समाजसेविका माधुरी शिंदे यांना समजले. त्यानंतर त्यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार केल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आर. के. धामणे तपास करीत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)