अपहरण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: May 5, 2016 15:18 IST2016-05-05T15:18:07+5:302016-05-05T15:18:07+5:30
अल्पवयीन भावंडाचे अपहरण करून एका आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रमोद उर्फ निखिल प्रकाश डोंगरे (वय २३) असे आरोपीचे नाव

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
नागपूर. दि. ५ : अल्पवयीन भावंडाचे अपहरण करून एका आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रमोद उर्फ निखिल प्रकाश डोंगरे (वय २३) असे आरोपीचे नाव असून, तो कामठी मार्गावरील पिवळी नदी भिमवाडी परिसरात राहतो.
सोनेगावमधील १५ वर्षीय मुलगी आणि तिच्या ८ वर्षीय आतेभावाला आरोपी प्रमोदने मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास सोनेगावमधून पळवून नेले. एका अज्ञात व्यक्तीने अपहृतांपैकी ८ वर्षीय मुलाला खापरी भागात सोडून दिले. मुलीवर आरोपीने बलात्कार केल्याचे माहित पडल्याने मुलीच्या वडीलांनी बुधवारी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.