अल्पवयीन मुलीवर भावी शिक्षकाचा बलात्कार
By Admin | Updated: September 17, 2016 18:36 IST2016-09-17T18:36:14+5:302016-09-17T18:36:14+5:30
: नात्यात असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना

अल्पवयीन मुलीवर भावी शिक्षकाचा बलात्कार
ऑनलाइन लोकमत
बीड,दि.17- नात्यात असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना शनिवारी तालुक्यातील हिवरापहाडी येथे उघडकीस आली. या प्रकरणी भावी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. त्याने नुकतेचं डीएड पूर्ण केलं आहे.
व्यंकट नवनाथ आढाव (रा. हिवरापहाडी) असे त्या भावी शिक्षकाचे नाव. पीडित मुलगी त्याच्याच गावातील रहिवाशी आहे. नातलग असल्याने व्यंकटचे तिच्या घरी जाणे - येणे होते. यातून त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात खेचले.सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शाळेतून आल्यावर ती घरात दप्तर ठेवण्यासाठी गेली. यावेळी त्यानेही घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्याशी कुकर्म केले. घडला प्रकार मुलीने आपल्या घरी सांगितला. नातेवाईक तिला घेऊन थेट पिंपळनेर ठाण्यात गेले. तिच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोेंद झाला. त्याच रात्री पिंपळनेर पोलिसांनी व्यंकटला ताब्यात घेतले. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.