अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: August 26, 2014 04:11 IST2014-08-26T04:11:25+5:302014-08-26T04:11:25+5:30
उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करून तो मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग .

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंबई : उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करून तो मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसाच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिर्झापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पीडित मुलगी मिर्झापूरमध्ये घरासमोर झाडू मारत असताना ५-६ जणांनी तिला पळवून नेले होते. त्यानंतर तिला लखनऊ येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तीला रेल्वेने दादर स्थानकात आणण्यात आले. त्या पाच जणांनी तिच्याकडील चांदीच्या वस्तू आणि मोबाइल हिसकावून घेत तिथून पळ काढला. पीडित मुलगी कशीबशी गोरेगाव स्थानकात पोहचली. तिथे तिने एका महिलेला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीत तिने घडलेला प्रकार सांगितला. वैद्यकीय तपासात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी ५ ते ६ अज्ञात जणांविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा मिर्झापूर पोलिस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती बोरिवली रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी.बागल यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)