ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
By Admin | Updated: May 30, 2016 04:25 IST2016-05-30T04:25:30+5:302016-05-30T04:25:30+5:30
नात्यातीलच अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मुलीला अश्लील मेसेज पाठवले.

ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
ठाणे : नात्यातीलच अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मुलीला अश्लील मेसेज पाठवले. तिला ब्लॅकमेल करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वाड्यातील तरुणासह अन्य दोन तरुणींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
राममारुती रोड येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या नावे वाड्यातील सुयोग भोईर याने फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे एका तरुणीच्या फेसबुकवर अश्लील मेसेज करून ते
त्या मुलीने केल्याचे सांगितले. तसेच आॅगस्ट २०१५ मध्ये मेसेजचे स्क्रीन शॉट त्या मुलीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
तिला नितीन कंपनी येथे बोलवून तिच्याशी अश्लील चाळे क रून विनयभंग केला.
त्यानंतर, त्याने दुसऱ्या
एका मुलीच्या फेसबुक अकाउंटवर चॅटिंग बॉक्समध्ये त्या मुलीचे अश्लील फोटो अपलोड करून तिची बदनामी केली. ते फोटो नातेवाइकांच्या फेसबुक व व्हॉट्सअॅपवर टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, सुयोगसह दोन तरुणींवरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)