मलेशियात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: May 31, 2014 23:12 IST2014-05-31T23:12:36+5:302014-05-31T23:12:36+5:30

मलेशियात एका 15 वर्षीय मुलीवर 38 जणांनी कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला.

Minor girl gang raped in Malaysia | मलेशियात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मलेशियात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

>क्वालालंपूर : मलेशियात एका 15 वर्षीय मुलीवर 38 जणांनी कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. 
मलेशियातील अॅशट्रो टीव्ही आणि द स्टार डेली वृत्तपत्रने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरेकडील केलानटान राज्यामध्ये 2क् मे रोजी ही घटना घडली. पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपींनी तिला फूस लावूून एका रिकाम्या झोपडीत नेले आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. 
या मुलीच्या 17 वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार झाला किंवा नाही याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेची माहिती माध्यमांत झळकल्यानंतर अख्खा देश सुन्न होऊन नागरिक रस्त्यावर उतरले. 
मलेशियातील एका मुस्लिम पक्षाने आपण देशात इस्लामी कायदा ‘हुद्दू’ लागू करणार असल्याचे सांगितले. हा कायदा लागू झाल्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल, असेही या पक्षाने म्हटले                      आहे. दुसरीकडे पोलीस या   घटनेबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. या लज्जास्पद, अमानुष घटनेत 38 जण सहभागी होते, असे जिल्हा पोलीसप्रमुख आझम ओथम यांनी सांगितले. 38 जणांपैकी 13 जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांनी घटनेच्या वेळी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे समोर आले आहे. आरोपींमध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीसह त्याच्या दोन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. मलेशियातील कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास 3क् वर्षाचा कारावास ठोठावला जातो तसेच फटक्यांचीही शिक्षा सुनावली जाते.  (वृत्तसंस्था)

Web Title: Minor girl gang raped in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.