अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: April 25, 2017 00:10 IST2017-04-25T00:10:14+5:302017-04-25T00:10:14+5:30

एका पंधरावर्षीय मुलीची फसवणूक करून तिला खोलीत डांबून ठेवून सहा आरोपींनी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला.

Minor girl gang rape | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अंबरनाथ : एका पंधरावर्षीय मुलीची फसवणूक करून तिला खोलीत डांबून ठेवून सहा आरोपींनी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. तिची सुटका करताना याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुलीने घरात हा संपूर्ण प्रकार सांगितल्यावर आरोपींविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अंबरनाथमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या या शालेय विद्यार्थिनीला तिच्या मित्रांपैकी एकाने आपला दुसरा मित्र आजारी असल्याची बतावणी करून न्यू बालाजीनगर परिसरात नेले. तेथील एका खोलीत तिला डांबून ठेवण्यात आले.
जो मित्र आजारी आहे, असे सांगण्यात आले होते, तो मित्र त्या खोलीत नव्हताच. ज्या तरुणाने तिची फसवणूक केली, त्याच्यासह ६ तरुणांनी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. तिची सुटका करताना ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या घरच्यांना सांगितल्यावर पालकांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये नितीन सानप (२१), कुशल बालकवडे (२०), गोविंद कोळी (२१) दिलीप महाडिक (२६) यांचा समावेश आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl gang rape