अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: April 25, 2015 09:49 IST2015-04-25T04:11:54+5:302015-04-25T09:49:45+5:30

तालुक्यातील अष्टमी परिसरात पंधरवड्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना ताजी असतानाच अष्टमीतीलच दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवर

Minor girl gang rape | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

रोहा : तालुक्यातील अष्टमी परिसरात पंधरवड्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना ताजी असतानाच अष्टमीतीलच दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत धमकावून तिच्यावर बलात्कार करण्याऱ्या हाजला कोतविलकर, नाजीम कोतविलकर, लियाकत खोत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलीलागेल्या ७ महिन्यांपासून धमकावून हाजला नाजीम कोतविलकर याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तर आरोपी नाजीम कोतविलकर, लियाकत खोत याने मुलीस पळवून नेण्यास सहकार्य केल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली. याविषयी नाईदा नाडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका आरोपीला अटक करून रोहा न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित दोन आरोपी फरार असून रोहा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पहिल्या घटनेचा तपास सुरू असतानाच ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Minor girl gang rape