अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: August 1, 2014 04:26 IST2014-08-01T04:26:50+5:302014-08-01T04:26:50+5:30

कळवा पूर्व येथील मफतलाल झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या १३वर्षीय मुलीवर बुधवारी दुपारी १.३० ते रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान दोन मुलांनी बलात्कार केला़ यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.

Minor girl gang rape | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

कळवा : कळवा पूर्व येथील मफतलाल झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या १३वर्षीय मुलीवर बुधवारी दुपारी १.३० ते रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान दोन मुलांनी बलात्कार केला़ यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
सुमित्रा चाळ, मफतलाल झोपडपट्टी येथे राहणारी १३वर्षीय मुलगी बुधवारी दुपारी नैसर्गिक विधीसाठी जाण्यासाठी आपल्या मैत्रिणीला बरोबर घेण्यासाठी गेली असता मैत्रिणीच्या शेजारी राहणाऱ्या मोहम्मद लियाकतअली मुल्ला उर्फ बाबू (२२) याने तिला जबरदस्तीने नातेवाइकाच्या घरात ओढून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या वेळी बाबू याच्याबरोबर रहीम नावाच्या अल्पवयीन मुलानेही या मुलीवर बलात्कार केला. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या आईने तिची शोधाशोध सुरू केली. त्या वेळेस ती बाबू याच्या नातेवाइकाच्या घरी घाबरलेल्या अवस्थेमध्ये बसलेली आढळून आली. तिच्या आईने तिची अधिक चौकशी केली असता घडलेल्या प्रकाराची माहिती तिने आईला दिली. तिच्या आईने लगेच कळवा पोलीस स्टेशन येथे जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाबू यास अटक केली असून, अल्पवयीन आरोपी फरार आहे. (वार्ताहर)

Web Title: Minor girl gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.