अल्पवयीन मुलीचा पोलिसांच्या गाडीतच आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: May 31, 2014 21:55 IST2014-05-31T20:12:09+5:302014-05-31T21:55:58+5:30

अल्पवयीन मुलीने पातूर पोलिसांच्या गाडीतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

A minor girl attempted suicide in police car | अल्पवयीन मुलीचा पोलिसांच्या गाडीतच आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीचा पोलिसांच्या गाडीतच आत्महत्येचा प्रयत्न

पातूर: एका अल्पवयीन मुलीस बाभूळगाव येथून पातूर पोलिस ठाण्यात आणले जात असताना तिने पोलिसांच्या गाडीतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार, ३१ मे रोजी पहाटे घडलेल्या या घटनेप्रकरणी पातूर पोलिसांनी सदर मुलीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलीवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पातूर पोलिस बाभूळगाव येथे गस्तीवर असताना बाभूळगावकडे एका दुचाकीवरून दोन मुले व एक मुलगी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी प्रेमप्रकरणाच्या संशयावरून त्यांना हटकले व त्यांची विचारपूस केली. या तिघांना ताब्यात घेऊन पातूर पोलिस स्टेशनमध्ये आणत असताना अल्पवयीन मुलीने तिच्या पर्समधील विष प्राशन केले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीस सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तर दोन मुले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी मुलीविरुद्ध भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुलगी व दोन मुले हे खामगाव तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी आहेत. या घटनेला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे बोलले जात असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: A minor girl attempted suicide in police car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.