शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील बांधकाम घोटाळ्यांची चौकशी; कामे न करताच लाखो रुपयांची बिले काढल्याची तक्रार

By यदू जोशी | Updated: August 3, 2018 02:09 IST

मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

मुंबई : मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.कामे न करताच लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याच्या एकूण सात तक्रारी भाजपाचे तुमसर (जि. भंडारा) येथील आमदार चरण वाघमारे यांनी केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे (मुंबई) अधीक्षक अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम दक्षता पथक मंडळ; मुंबईचे अधीक्षक अभियंता हे या समितीचे अन्य दोन सदस्य असतील.मंत्रालयात पहिल्या माळ्यापासून सातव्या माळ्यापर्यंत साईनेज बोर्ड लावण्याचे काम न करताच ते केल्याचे दाखवून २६ लाख ५० हजार रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार करण्यात आला. मंत्रालय परिसरात ढिगारे हटविले आणि टॉयलेट ब्लॉकचे नूतनीकरण केल्याचे कागदोपत्री दाखवून ३४ लाखांचा अपहार केला. टाकाऊ वस्तूचे ढिगारे उपसण्यासाठी मजूर लावल्याचे दाखवून २०.५२ लाख रुपये लाटले. प्रधान सचिवांच्या दालनात नूतनीकरणाचे काम न करता ४६ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला.टाईल्सचे काम कागदोपत्री दाखवून २५ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला, आदी सहा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यातील काही प्रकरणांमध्ये आधीच विविध अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केली होती. तथापि, आता सर्व तक्रारींची एकत्रित चौकशी करण्याची भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली असून चौकशी समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले आहे. हे सगळे घोटाळे विद्यमान युती सरकारच्या काळात झालेले आहेत.तक्रारींतील धक्कादायक बाबी- साफसफाईच्या कामासाठी मंत्रालयात १७ आॅगस्ट २०१५ या एकाच दिवशी ८३० मजूर कामावर होते असे दाखविण्यात आले.- विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनाच्या नूतनीकरणातही घोटाळे- या दालनात ९ लाख रुपये किमतीचे सोनेरी वॉलपेपर लावण्यात आले

टॅग्स :Mantralayaमंत्रालय