मंत्र्यांना धाडणार सडके आंबे!

By Admin | Updated: January 31, 2015 05:32 IST2015-01-31T05:32:46+5:302015-01-31T05:32:46+5:30

गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही

The ministers will throw the mangoes! | मंत्र्यांना धाडणार सडके आंबे!

मंत्र्यांना धाडणार सडके आंबे!

मुंबई : गारपीट आणि थंडीच्या तडाख्याने कोकणातील हापूस आंबा आणि भातशेतीचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारमार्फत एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. परिणामी, भात शेतकरी आणि आंबा उत्पादकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राणे यांनी सडक्या आंब्यांनी भरलेल्या पेट्या शिवसेना आणि भाजपा मंत्र्यांना पाठवल्याचे सांगितले.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २ हजार कोटींच्या पॅकेजमध्ये कोकणाचा उल्लेख नाही. शिवाय हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना घोषित केलेली मदत खूपच तुटपुंजी आहे. कोकणवासीयांनी शिवसेना आणि भाजपाला २३ आमदार दिले आहेत. मात्र सरकारमध्ये त्यांचा दबदबा दिसत नसल्याची टीकाही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना सडके आंबे पाठवले. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नसल्याने मंत्र्यांना सडके आंबे पाठवत असल्याचे राणे यांनी सांगितले. यापुढेही नुकसानभरपाई करण्यास राज्य सरकारने दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The ministers will throw the mangoes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.