मंत्र्याना दिवाळीनिमित्त डाळींची भेट

By Admin | Updated: November 8, 2015 01:14 IST2015-11-08T01:14:49+5:302015-11-08T01:14:49+5:30

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्य जनतेवर लादल्या गेलेल्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली

Minister's visit to Dalalai for Diwali | मंत्र्याना दिवाळीनिमित्त डाळींची भेट

मंत्र्याना दिवाळीनिमित्त डाळींची भेट

मुंबई : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्य जनतेवर लादल्या गेलेल्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांना दिवाळी निमित्त डाळींची पॅकेट््स भेट देऊन सरकारविरोधात आंदोलन केले. शिवाय भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात घुसून महागड्या डाळींची पॅकेट्स भेट देऊन सरकारविरोधात आंदोलन केले.
सकाळी राष्ट्रवादी भवन येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, तसेच चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत ही डाळींची पॅकेट्स मंत्र्यांना पाठविण्यात आली. डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी धाडीचे नाटक या सरकारने केले खरे, पण जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार जप्त केलेल्या डाळी स्वस्त धान्य दुकानातून विक्रीकरिता उपलब्ध करून देण्याचे अधिकार राज्य शासनाचे असताना ती डाळ जाणीवपूर्वक पुन्हा साठेबाजांना का उपलब्ध करून देण्यात आली, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला.

Web Title: Minister's visit to Dalalai for Diwali