शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मंत्र्यांनी बोलताना संयम पाळावा, देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली राजधर्माची आठवण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ साेहळ्यात वाजपेयींनी दिलेल्या मंत्राची करून दिली आठवण; राजभवनमध्ये रंगला दिमाखदार कार्यक्रम; ‘मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन’ पुरस्काराने मुख्यमंत्र्यांचा गौरव; अनेक मान्यवरांची मांदियाळी

मुंबई : मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे, अशा कानपिचक्या देताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी राजधर्म पाळण्याच्या दिलेल्या मंत्राची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना करून दिली. त्याचबरोबर आपण मुंबईत खूश आहोत, असे सांगून दिल्लीत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७५ वर्षांची वयाची सीमा स्वतः नरेंद्र मोदींजींनी ठरवली असली, तरी ती आम्हाला मान्य नाही, २०२९ साली नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, अशी आमची इच्छा असल्याचेही फडणवीस म्हणाले.

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५’च्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. 

सरकारमधील काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाविरोधात टोकाची भाषा वापरतात, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, याबाबत आपली भावना काय आहे ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली.

 जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. मंत्री म्हणून आपली भूमिका आहे, ज्याचा उल्लेख कधीतरी अटलबिहारी वाजपेयींनी केला होता की, मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपले विचार, आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने कोणाही सोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. त्यामुळे मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे, आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही, असा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, तेव्हा मी त्यांच्याशी संवाद करतो आणि सांगतो आता तुम्ही मंत्री आहात त्यामुळे तुम्ही संयम बाळगूनच बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाहीनरेंद्र मोदी लवकरच ७५ वर्षांचे होतील, ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत अशी आपल्या पक्षाची इच्छा असेल यात शंका नाही. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, यात तुम्ही आपल्याला कुठे पाहता? असे विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की, ज्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फीट आहे. आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन, मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही, मी मुंबईत अतिशय खूश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचे वातावरण उत्तम आहे आणि मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत, त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी