उद्धव घेणार मंत्री, आमदारांचा वर्ग
By Admin | Updated: December 9, 2014 02:22 IST2014-12-09T02:22:22+5:302014-12-09T02:22:22+5:30
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 18 डिसेंबरला नागपुरात येत असून त्या दिवशी ते पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
उद्धव घेणार मंत्री, आमदारांचा वर्ग
नागपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 18 डिसेंबरला नागपुरात येत असून त्या दिवशी ते पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर आपल्या आमदारांचा वर्ग ते पहिल्यांदाच घेणार आहेत.
सध्या परदेशात असलेले ठाकरे हे 13 डिसेंबरला भारतात परतणार आहेत. आधी ते 16 तारखेला नागपुरात येणार होते. आता हा दौरा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे.
शिवसेना सत्तेत आल्यानंतर पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांकडून कोणत्या अपेक्षा आहेत, लोकांची कामे करण्याबाबत वेगळेपण
काय असावे या बाबत ते मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
त्याच दिवशी शिवसेनेचा एखादा मेळावाही हो: शकतो. त्यात काही नेते, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील, असे सूत्रंनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)