गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दोनदा केले मतदान
By Admin | Updated: July 11, 2015 18:22 IST2015-07-11T18:12:07+5:302015-07-11T18:22:14+5:30
नाव बदलून दोनदा मतदान केल्याचे उघड झाल्याने गृहराज्यमंत्री रणजित पाटील अडचणीत सापडले आहेत.

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दोनदा केले मतदान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - नाव बदलून दोनदा मतदान केल्याचे उघड झाल्याने गृहराज्यमंत्री रणजित पाटील अडचणीत सापडले आहेत. पाटील व त्यांच्या कुटुंबियांची नावं एकाच वेळी अकोला पूर्व व मुर्तिजापूर या दोन्ही मतदारसंघात आढळली आहेत, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या प्रकारानंतर रणजित पाटील व कुटुंबियांविरोधात निवडणूक अधिका-यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.
२०१० साली विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना रणजित पाटील यांनी आपण अकोला पूर्व मतदारसंघातील मतदार असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र असं असतानाही २०११ व २०१५मध्ये पाटील व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नाव अकोला पूर्व आणि मुर्तिजापूर या दोन्ही मतदार संघातील यादीत आढळले आहे, असा दावा काटे यांनी केला आहे. या प्रकारानंतर गृहराज्यमंत्री असलेल्या रणजित पाटील यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी होत आहे. तसेच पाटील यांनी जाणूनबुजून हा प्रकार केल्याने त्यांची आमदारकीच रद्द करावी अशी मागणी काटे यांनी केली आहे.