शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर...; मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितला पुढचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 14:39 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातात तिथे दुतर्फा लोक स्वागत करतात. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत असं शंभुराज देसाई म्हणाले.

मुंबई - धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल असा आमचा विश्वास आहे. त्याचं कारण बहुमतातील शिवसेना ही आमच्याकडे आहे. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यातील सर्व लोकप्रतिनिधी जे लोकांमधून निवडून आलेत. त्यांचे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे. परंतु शेवटी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. जो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो मान्य करत आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जावू असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. 

शंभुराज देसाई म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळेल मात्र समजा, न्यायालयाने वेगळा निर्णय दिला तर आमची सर्वबाजूने तयारी सुरू आहे. लोकांना ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन कोण पुढे चालले आहे. हे २ महिन्यात लोकांना पटलेले आहे. शेकडो लोक आम्ही जेव्हा मतदारसंघात जातो तेव्हा स्वागताला येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे जातात तिथे दुतर्फा लोक स्वागत करतात. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील परंतु विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाताना नवीन चिन्ह लोकांपर्यंत रुजवण्यास वेळ लागेल. परंतु आम्ही ते लोकांपर्यंत घेऊन जावू. कष्ट करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही शाखाप्रमुख, बूथप्रमुखांपर्यंत शिवसेना पोहचवली आहे. त्यामुळे आम्हाला फारसी अडचण येणार नाही असा विश्वासही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. 

मनसे युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचादरम्यान, मनसेसोबत युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही जे ४० आमदार शिंदेसोबत आहोत त्यांनी एक ओळीचा ठराव पहिल्या दिवशी केला आहे. जो निर्णय घ्यायचा आहे त्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना दिले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गेले तर आम्हालाही आनंद होईल. हिंदुत्ववादी विचारांचे विभाजन होऊ नये हे आमचेही मत आहे. २०१९ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही मते मागितली. परंतु सरकार बनवताना लोकांच्या मतांचा अनादर करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो. भाजपाला बाजूला ठेवले. लोकांना आजही हिंदुत्ववादी विचारांचे विभाजन नकोय. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जे नेते ठरवतील ते मान्य करू असं मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितले. ते टीव्ही ९ च्या मुलाखतीत बोलत होते. 

दसरा मेळावा शिवतीर्थावर होईलदसरा मेळावा हा ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आम्ही खरे वारसदार आहोत. तो आमचाच होणार. वर्षावरील गणरायाच्या दर्शनानंतर आमदारांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची आग्रही मागणी केली. आमचाच दसरा मेळावा शिवतीर्थावर होईल असा विश्वासही मंत्री देसाई यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र नंबर वन करण्यासाठी गणरायाला साकडं  २ वर्षाच्या कोविडनंतर राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी २ वर्षात महाराष्ट्र राज्य देशात नंबर वन करण्याची ताकद, शक्ती आणि आशीर्वाद बाप्पानं आम्हाला द्यावा असं साकडं मी गणराया चरणी केली आहे असं शंभुराज देसाईंनी सांगितले.  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसे