शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:23 IST

एकनाथ शिंदेंच्या कामाची तुम्ही अनेकदा दखल घेतली आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही. आज तुमची एवढी भूमिका बदलली कशी असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.

मुंबई -  राज ठाकरे यांनी ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली ते पाहता कन्फ्यूज नेत्यांमध्ये आणखी एक नेत्याची भर पडली आहे. काल काय बोललो, आज काय बोलायचे त्यात ते गोंधळलेले आहेत. लाव रे तो व्हिडिओ असा प्रयोग केला, तर त्यांची उबाठा नेत्यांविषयी वक्तव्ये काय हे त्यातून दिसेल. शिवसेनाप्रमुखांच्या आजूबाजूला जे बडवे बसलेत त्यांनी बाळासाहेबांना घेरले म्हणून शिवसेना सोडली असं राज ठाकरे यांनी म्हटले. आज तुम्ही त्या बडव्यांकडे जातायेत. तुम्ही एकदा काय दहा वेळा गेले तरी आम्हाला काही देणे घेणे नाही. दोन बंधू एकत्र आले त्याचा आनंद आम्ही त्यावर टीका करत नाही. परंतु १८-१९ वर्ष तुम्ही जो संघर्ष केला, तुमच्यासोबत असलेल्या मनसैनिकांनी संघर्ष केला त्याचे काय? असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी विचारत राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही जेव्हा धाडसी पाऊल उचलले तेव्हा तुम्ही कौतुक केले होते. आता आम्ही चाटू वाटायला लागलो. मागच्या लोकसभेला तुम्ही मोदींचे गुणगान गात होता. आता ते दुश्मन वाटायला लागले. मनसैनिकांची अवस्था काय, कोणता झेंडा घेऊ हाती, उबाठाचा, शरद पवारांचा, काँग्रेसचा...तुमचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल माहिती नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे टाळा. जे तुम्हाला जमले नाही ते आम्ही हिंमतीने केले. एकनाथ शिंदेंच्या कामाची तुम्ही अनेकदा दखल घेतली आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही. आज तुमची एवढी भूमिका बदलली कशी, मनसैनिकांनी शरद पवार, राहुल गांधींच्या घोषणा देणार का? असा टोला त्यांनी मनसेला लगावला. 

तसेच आता मनसेने थांबले पाहिजे, त्यांनी उबाठात सामील झालं पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचं काम अनेकजण करतात त्यात आणखी एक भर पडली आम्हाला फरक पडत नाही. शिंदे यांनी जी हिंमत दाखवली ती महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांच्या ताकदीचा आम्हाला गर्व नाही तर अभिमान आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं.

दरम्यान, एका माणसाने शिवसेना इतरांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारले. त्याला जपण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तुमची भूमिका काय याचे आम्हाला देणे घेणे नाही. निवडणूक आयोगावरील भूमिकेवर आमचा आक्षेप नाही. दुबार मतदार असेल काढलेच पाहिजे. मतदार याद्या स्वच्छ असल्या पाहिजे ही आमचीची भूमिका आहे. परंतु दरवेळी राजकीय भूमिका बदलून वेगवेगळी विधाने करून नमो पर्यटन केंद्राला विरोध करणे योग्य नाही. फोडण्याची भाषा करतायेत, जे फोडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. उद्या हा मनसैनिक कुठे असेल याची चिंता करा असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Confused Raj Thackeray: MNS workers wonder which flag to hold, says Shinde Sena.

Web Summary : Sanjay Shirsat criticizes Raj Thackeray's shifting stances, questioning MNS's direction and loyalty. He highlights Thackeray's past support for Modi and praises Shinde's courage, suggesting MNS join Uddhav Thackeray's faction.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे