शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:56 IST

Minister Pratap Sarnaik News: कारशेडसाठी नवी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने हाती घेतली जाणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Minister Pratap Sarnaik News: मीरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मुख्यालय या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. मीरा-भाईंदर येथील डोंगरी कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता असल्याने झाडतोड, वाहतूक कोंडी तसेच परिसराच्या विकास आराखड्यावर परिणाम होणार असल्याबाबत स्थानिक ग्रामस्थ , शहरातील नागरिक, विविध संस्था व पर्यावरणवादी संस्थांनी अनेक आक्षेप नोंदवले  होते. या सर्व बाबींचा व्यापक आढावा घेतल्यानंतर पर्यायी जागांचा विचार करणे अधिक योग्य ठरेल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.

अधिसूचना जारी झाल्यानंतर कारशेडसाठी नवी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने हाती घेतली जाणार असून मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. सरकारच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे डोंगरीतील रहिवाशांनी व पर्यावरणवादी कार्यकर्ते, संघटनांनी समाधान व्यक्त केले असून पर्यावरण आणि नागरिकहिताला प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mira-Bhayandar Metro: Dongri Car Shed Cancelled, Notification Soon

Web Summary : The government has decided to cancel the proposed metro car shed project in Dongri, Mira-Bhayandar, due to local opposition and environmental concerns. An official notification will be issued soon. Minister Pratap Sarnaik announced that alternative locations are being considered to ensure timely project completion.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMetroमेट्रोMira Bhayanderमीरा-भाईंदर