"मोदी म्हणाले होते, 'रुपया पडला की इज्जत जाते', आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच काढलीय"- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:49 PM2022-05-17T12:49:25+5:302022-05-17T12:51:48+5:30

शेजारील देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत.

Minister Jitendra Awhad has criticized PM Narendra Modi over Rupee Fall | "मोदी म्हणाले होते, 'रुपया पडला की इज्जत जाते', आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच काढलीय"- जितेंद्र आव्हाड

"मोदी म्हणाले होते, 'रुपया पडला की इज्जत जाते', आज रुपया इतका पडलाय की भारताची चड्डीच काढलीय"- जितेंद्र आव्हाड

googlenewsNext

मुंबई – आम्ही पेट्रोल विचारात घेत नाही, डिझेल विचारत नाही. गॅसचे दर विचारात घेत नाही. पडलेल्या रुपयाची किंमत विचारात घेत नाही. देश का रुपया जब गिरता है तब देश की इज्जत उतर जाती है असं मोदी म्हणाले होते. परंतु आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपया इतका खाली गेलाय की भारताची चड्डी काढलीय अशा शब्दात मी सांगेन असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपल्याला भोंग्याबद्दल बोलायचं असते, जाती-धर्मावर बोलायचं असते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यासारखे देश जात,वर्चस्ववाद, समुह व्यवस्था, धर्मव्यवस्थेमुळे काय वाटोळे झालंय ते बघतोय. सगळे जळून खाक झालेत. त्याठिकाणी खायचे वांदे झाले आहेत. आपण त्यातून काही शिकणार असू तर ठीक असं सांगत आव्हाडांनी भाजपाला टोला लगावला.

तसेच जो दुसऱ्यांसाठी खड्डे बनवायला जातो तो स्वतःच खड्ड्यात कसा जातो याचं आधुनिक काळातलं उदाहरण म्हणजे हा भोंगापती. हिंदू मुसलमान वाद करण्यासाठी तुम्ही बोंबा उकरून काढला परंतु सगळ्यात जास्त नुकसान हे हिंदूंचाच झालं. मी सुद्धा हिंदू आहे पण मला तुमचं हिंदुत्व मान्य नाही जे इतरांना तुच्छ लेखतात. अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर टीका केली घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

नाना पटोलेंना प्रगल्भता नाही - आव्हाड

महाराष्ट्र सरकारमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत. एकाच घरामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ यांची भांडणे असतातच परंतु बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते. ही प्रगल्भता नाना पटोलेंमध्ये नाही इनम्यॅच्युरिटी आहे अशा शब्दात आव्हाडांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

केतकीनं जी बाबासाहेबांवर पोस्ट लिहिलीय ती मी पोस्ट करणार

अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांबद्दल लिहिलं त्यामुळे सदाभाऊ ना कदाचित राग येत नसेल परंतु तिने बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले आहे जर तुम्ही तिला समर्थन करत असाल तर हिंमत असेल तर शिवाजी पार्कात एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिने लिहिलेली बाबासाहेबांबद्दल ची भीम बांधवांबद्दल लिहिलेली पोस्ट टाकणार आहे ती स्त्री आहे म्हणून तिला सोडून देणं चालणार नाही. हा बौद्धिक प्रामाण्यवाद आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Minister Jitendra Awhad has criticized PM Narendra Modi over Rupee Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.