शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचं संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 01:06 IST

विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यानं गौरविण्यात आलं आहे.

नागपूर- विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यानं गौरविण्यात आलं आहे. यावेळी  लोकमत की अदालत हा कार्यक्रम ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या संचालनात सुरू करण्यात आला. लोकमत की अदालतमध्ये मान्यवरांना सामान्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यात आले आहेत.यावेळी उज्ज्वल निकम यांनी शिवसेना-भाजपामध्ये सुसंवाद निर्माण होत नाहीये आहे. भाजपाचं आजवरचं वागणं अडसर निर्माण करत आहे, असा प्रश्न विचारला. त्याला अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे. नाना करत प्यास तुम्हीसे कर बैठे, कधी तरी असं होत असतं, मतमतांतरं असतात, माझ्याकडे वनमंत्री म्हणून वाघाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, ती पूर्ण प्रामाणिकपणे करणार आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. सरपंच पदापासून संसदेपर्यंत उत्तम कामगिरी करणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याची प्रथा ‘लोकमत’ने सुरू केली आहे. या मालिकेतील विधिमंडळ पुरस्काराचे हे दुसरे पुष्प आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आमदारांचा सन्मान केला जाणार आहे. सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

टॅग्स :Lokmat Vidhi Mandal Purskarलोकमत विधिमंडळ पुरस्कारnagpurनागपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार