शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

किमान वाचन, गणितासाठी कृती कार्यक्रम; राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम

By समीर देशपांडे | Updated: March 7, 2025 12:54 IST

सुट्टीतही करावे लागणार काम

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील दुसरी ते पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांना आदल्या इयत्तेतील धड्याचे किमान वाचन आणि किमान बेरीज-वजाबाकी येत नसल्याचे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्य केले आहे. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ‘नास’ आणि ‘असर’ यांसारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरांवरील विविध सर्वेक्षणांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची जी वस्तुस्थिती दर्शविण्यात आली आहे, त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भारत सरकारने निपुण भारतअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६/२०२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी हा कृती कार्यक्रम घेण्यात येईल.

शिक्षकांनी हे करायचे आहेशिक्षकांनी दिलेल्या नमुन्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करावी. त्यानुसार अपेक्षित क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वत:चा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखायचा आहे. ३० जून पर्यंत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान ७५ टक्के विद्यार्थी अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील, याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करावयाची आहे.

सुट्टीतही करावे लागणार कामविद्यार्थ्यांनी ही कौशल्ये प्राप्त करावीत यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्तचा वेळ शिक्षकांनी वापरावा. याच कालावधीत मे महिन्याचीही सुट्टीही येत असल्याने सुट्टीतही अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबाबत संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी नियोजन करावे अशाही सुचना आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही बजावले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीGovernmentसरकार