शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Mini Lockdown in Maharashtra: राज्यात मिनी लॉकडाऊन; निर्बंधांबाबत आज निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 06:39 IST

Mini Lockdown in Maharashtra: हॉटेल्स, दुकानांच्या वेळा कमी करणार, कॉलेजही होणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होत असल्याने राज्य सरकार बुधवारी मिनी लॉकडाऊनसारखे आणखी काही निर्बंध जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. त्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देतील व निर्बंध जारी केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळाची बुधवारी होणारी बैठक उद्या होणार नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांचे मंत्री, पोलीस, प्रशासन, टास्क फोर्स यांच्यासह बैठक घ्यावी, त्यात निर्बंधांचे स्वरुप निश्चित करावे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. केंद्राने राज्यांना लस, औषधांसह वाढीव निधीही दिला आहे. त्यामुळे राज्याने काम करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. 

केंद्राने सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीबाबत निर्बंध जारी केले होते. तसाच निर्णय राज्यात घेतला जाऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती व अन्य कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवणे असा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. 

‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’पुणे : सध्या जिल्ह्यात पाॅझिटिव्हिटी दर तब्बल आठरा टक्क्याच्या पुढे गेला आहे. यामुळेच राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करून शहर आणि ग्रामीण भागातील सर्व खासगी, सरकारी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुढील आदेशापर्यंत पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व खासगी व सार्वजनिक ठिकाणी आता ‘लस नाही, तर प्रवेश नाही ’ असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच मास्क न घालणाऱ्या लोकांना ५०० रुपये तर रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड करण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस