शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
3
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
4
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
5
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
6
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
7
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
8
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
9
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
10
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
11
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
12
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
13
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
14
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
15
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
16
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
17
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
18
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
19
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
20
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:47 IST

Pratap Sarnaik News: ३० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या असुरक्षित, दाटीवाटीने वसलेल्या इमारतींचा किमान ५ इमारतींचा गट करून त्यांचे 'मिनी क्लस्टर' धोरण निश्चित केले जात आहे.

Pratap Sarnaik News: मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असून किमान ५ इमारतीच्या गटाला अथवा  ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला 'मिनी क्लस्टर' म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचे धोरण निश्चित केले जात आहे. या संदर्भात तातडीने सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजूरीसाठी पाठविण्याच्या सूचना नगरविकास विभागाला केल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील किमान ५ इमारतींचा गट करून अथवा  ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेचा एकत्रिकृत विकास, नियंत्रक व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार क्लस्टर योजनेचे लाभ देण्यात येतील. तसा सुधारित प्रस्ताव तातडीने नगरविकास विभागाने तयार करून मंजूरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवून द्यावा, अशा दिल्या आहेत.

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती

ग्रामपंचायत काळातील जुन्या ३० वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या इमारतींच्या विकासासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचे निश्चित करण्यात आले असून अशा इमारतींना UDCPR मधील तरतुदीनुसार असेसमेंट उताऱ्यावरील बांधकाम क्षेत्र प्रमाण मानून त्यावर परिगणना करून ६जी टेबल च्या वर प्रोत्साहन चटई क्षेत्र मिळवून देण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे आगामी काळात धोकादायक व आयुर्मान झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा वेग वाढणार असून झोपडपट्टीमुक्त, सुरक्षित व शाश्वत शहराच्या दिशेने पाऊल टाकण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

दरम्यान, ३० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या असुरक्षित, दाटीवाटीने वसलेल्या इमारतींचा किमान ५ इमारतींचा गट करून त्यांचे 'मिनी क्लस्टर' धोरण निश्चित केले जात आहे. सध्या येथील रहिवाशांना  स्थानांतराची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते स्टेजिंग एरिया नसल्याने या नागरिकांसाठी अडचणी वाढल्या होत्या. मात्र क्लस्टर मॉडेल वाढवून या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mini-clusters of 5 buildings soon; Pratap Sarnaik's efforts successful.

Web Summary : Mira-Bhayandar will soon see 'mini-clusters' for building redevelopment. Groups of five or more buildings will get cluster benefits. Minister Sarnaik announced a revised proposal for old buildings, offering increased construction area, aiming for faster, safer urban renewal. This initiative addresses resident relocation challenges.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक